वृत्तसंस्था/ मुंबई
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने 10 कोटी डॉलरचा निधी सादर केला आहे. सदरचा निधी हा बँक लहान व्यवसायांसाठी मदत करण्यास सहाय्य म्हणून देणार असल्याची माहिती आहे. या निधीला अनेक कंपन्यांसोबत करार करुन सादर करण्यात आल्याचे समोर येत आहे.
सदरचा निधी उभारण्यासाठी बँकेने मास्टरकार्ड, यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पेरेशनसोबत मिळून सादर केला आहे. हा उभारण्यात आलेला निधी बँक लहान व्यावसायिकांसह विशेष करुन महिलांच्या नेतृत्वात सुरु असणाऱया व्यवसायांना सहाय्य देण्यासाठी यातून मदत करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण एचडीएफसीने दिले आहे.
लहान व्यवसाय अडचणीत
कोरोनामुळे लहान व्यवसाय हे मोठय़ा प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले असून अन्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न असे व्यावसायिक करत आहेत. अशा व्यवसायांना मदत मिळवून देण्याचा अशा उपक्रमातून मदत करणार आहे.









