सोशल मीडियावर अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पाहून सर्व जण हैराण झाले आहेत. या नव्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने एकाचवेळी 50 ऑम्लेट खाल्ल्याचे दिसुन येते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्यक्तीच्या जेवण्याची स्टाइल पाहून लोक मजेशीर कॉमेंटही करत आहेत.
इन्स्टाग्रामवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तब्बल 50 ऑम्लेट खाताना दिसून येतो. यात टेबलावर केळीच्या पानांमध्ये वेगवेगळय़ा अंडय़ांचे ऑम्लेट ठेवलेले दिसत आहेत. हे सर्व ऑम्लेट हा व्यक्ती एका मागोमाग एक खाताना दिसून येत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये ऑम्लेट खाणाऱया व्यक्तीचे नाव सापट्टू रामन असे आहे. जगण्यासाठी जेवायला हवे असे मोठी मंडळी म्हणायची. परंतु काही लोकांचा आहार पाहून ते जगण्यासाठी खात नाहीत, तर खाण्यासाठी जगतात असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
सापट्टू रामन दुसऱया एका व्हिडिओमध्ये भात आणि अनेक सांबर वडे खाताना दिसून येतो. त्याच्या व्हिडिओवर लोक कॉमेंट करत आहेत. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत 6.1 दशलक्ष लोकांनी पाहिले असून त्यावर 465 कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.









