आजच्या जमान्यात मन एकाग्र व शांत ठेवणे ही एक तपश्चर्याच आहे. मनाची एकाग्रता व शांतता भंग करण्यासाठी मोबाईल व टिव्ही नावाच्या रंभा/ उर्वशी अप्सरा कायम हजर आहेत. जगातील एकही माणूस असा सापडणार नाही जो या दोन्ही गोष्टींसमोर हतबल नाही. परंतु या दोन्ही साधनांमुळे मनुष्यप्राण्याला जितका फायदा झाला आहे. त्याच्या दुपटीने तोटा झाला आहे. आता परीक्षांचा सिझन सुरू आहे. मुलांना अभ्यासाला बसवणे हे आयांसमोर एक आव्हान असते. मुलं हुशार असतात, परंतु एका ठिकाणी बसून एकाग्रतेने शांतपणे अभ्यास करणे त्यांना जमत नाही. या विकाराला ADHD (अटेंशन डेफीसीट हायपरऍक्टिव्हीटी डिसॉर्डर) असे म्हणतात. सतत हालचाल करत रहाणे, वस्तू ओढणे, पाडणे, फोडणे, चंचललता, गुणगुणत/ बडबडत रहाणे, भूणभूण करणे असे प्रकार सुरू असतात. ही डिसॉर्डर मध्यमवयीन व्यक्तीत सुद्धा आढळू शकते. अशा हुशार मुलांच्या हुशारीचा एकाग्रता नसल्यामुळे काहीही फायदा होत नाही. ही मुलं शैक्षणिक क्षेत्रात व पुढे जाऊन आयुष्यात पण मागे पडायला लागतात.
केस नं. 1- अर्जित वय वर्षे 5 इतका चंचल आणि हट्टी की त्यांच्या मम्मीला त्याला कुठेही घेऊन जायचं म्हणजे भीती वाटायची. सतत वस्तुंची ओढाओढी, पाडवणे, फोडणे, नासधूस करणे, त्यामुळे त्यांचे नातेवाईक सुद्धा घाबरत असत. एकपाठी असूनसुद्धा त्यांच्या हय़ा स्वभावामुळे तो काहीही लिहू शकत नसे. सगळय़ा कविता, अभ्यास, तोंडपाठ पण लिहिता येत नसल्यामुळे चांगल्या शाळेतही प्रवेश मिळत नव्हता. आमच्या दवाखान्यात आल्यावरही त्याने माझी रूम अस्ताव्यस्त केली. आईशी उद्धट वागत होता. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक औषधाच्या विवरणात लहान मुलांच्या वागण्याचा सुद्धा उहापोह केलेला असतो. त्यामुळे मुलांच्या फक्त ऑब्झर्वेशनमुळे औषध ओळखण्यास मदत होते. होमिओपॅथीक औषधे व बॅचफ्लॉवर मिक्स 9 दिल्यावर तो हळूहळू पूर्ण सुधारला. व्यवस्थित लिहू शकतो. अर्जितला आता अभ्यासात एप्लस मिळतो. बॅचफ्लॉवर मिक्स नंबर ‘9` www.thebachflower.com वर उपलब्ध आहे. (अर्जित नाव काल्पनिक आहे)
केस नं. 2- रचना वय वर्षे 32. तिची आई अचानक वारली. हा धक्का पचवता न आल्याने रचनाच्या स्वभावात खूप बदल झाले. चंचलता, राग, चिडचीड, धुसफूस, अचानक गोष्टींचा विसर पडणे असा त्रास होऊ लागला. तिला बॅच फ्लॉवर मिक्स 22 दिल्यावर (www.thebachflower.com) हळूहळू रचना सुधारू लागली. (नाव काल्पनिक आहे.)
उपचार- अशा सर्व मानसिक विकारांवर उत्कृष्ट साईडइफेक्ट विरहीत उपचार शक्मय आहेत. मानसिक विकारांवर आमचे संशोधन अविरत सुरू असते. त्यातून मुलांच्या विसराळूपणावर, आत्मविश्वासावर तसेच मोठय़ांच्या मनातील गोंधळावर उत्कृष्ट होमिओपॅथिक तसेच पुष्पौषधे उपलब्ध आहेत.
इतर-समुपदेशन, ग्रुपथेरपी, आपले विचार लिहून काढून स्वतःच स्वतःचे समुपदेशन करणे यांनेही खूप फायदा होतो. बॅचफ्लॉवर मिक्स स्वतःच कॉम्बिनेशन करून घेणे शक्मय असल्याने एकाच वेळी जास्तीत जास्त पाच औषधे एकत्र घेऊ शकतो. या औषधांची सूची, वेबसाईटवर उपलब्ध आहे. शिवाय काही औषधांच्या दुकानातही ही औषधे उपलब्ध आहेत.