आरटीओ कार्यालयात करापोटी 89 लाख 30 हजार रक्कम जमा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचे सावट असतानाही जिल्हय़ात या आठ दिवसात गाडय़ांची विक्रमी खरेदी झाली. यामध्ये सर्वाधिक 562 दुचाकी वाहनांची खरेदी झाली असून त्यानंतर 136 चारचाकी वाहनांची खरेदी झाली आहे. या वाहनांच्या करापोटी तब्बल 89 लाख 30 हजार 319 रूपये जमा झाले असल्याची माहिती रत्नागिरी आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.
दसऱयाच्या मुहूर्तावर वाहन क्षेत्रात आर्थिक उलाढाल अपेक्षित अशी झाली नसली तरी दिवाळीच्या मुहूर्त साधत जवळपास 1 कोटीच्या दरम्यान ही विक्रमी खरेदी झाली आहे. कोरोनाचे सावट असतानाही ही खरेदी म्हणजे विशेष बाब असल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक खरेदीत दुचाकी वाहने आघाडीवर आहेत. चारचाकी वाहनांचीही खरेदीही 136 इतकी झाली आहे. तर 10 रिक्षांचीही खरेदी झाली आहे. यामध्ये 23 हजार 865 इतकी उशीरा कर वसुलीदेखील करण्यात आली आहे.









