मुंबई \ ऑनलाईन टीम
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. अशातच फडणवीस यांच्या पाठोपाठ राषट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीचे काही फोटो देखील समोर आले आहेत. सध्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे रोजी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. या भेटीची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ही केवळ सदिच्छा भेट होती,” असं देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








