ऑनलाइन टीम / पुणे :
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी ‘एप्रिल फूल’ च्या निमित्ताने कोणत्याही अफवा पसरवू नये असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात एक पत्रक देखील पोलिसांकडून काढण्यात आले आहे.
उद्या एक एप्रिल आहे. त्या निमित्ताने एप्रिल फूल करू नका, भीतीचे वातावरण निर्माण करू नका, नाहीतर जेलची हवा खावी लागेल. असं या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, एप्रिल फूल च्या निमित्ताने लोकांकडून वेगवेगळे मेसेज पाठवले जातात. मात्र यावर्षी मजा म्हणून किंवा एप्रिल फूल करण्यासाठी कोरोना संबधित चे मेसेज, व्हिडिओ किंवा अफवा यामध्ये जमावबंदी उठवली आहे, यासारख्या आशयाचे मेसेज ही टाकले जाऊ शकतात. या अशा मेसेजमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत यासाठी एप्रिल फूल करू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
तसेच अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास, वायरल करणाऱ्या विरुद्ध व ग्रुप एडमिन वर गुन्हे दाखल करण्यात येतील असे ही या पत्रकामध्ये म्हटले आहे.








