वृत्तसंस्था/ लंडन
प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात ऍस्टन व्हिलाने अर्सेनेलचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या पराभवामुळे अर्सेनलच्या विजयी घोडदौडीला आळा बसला आहे.
या सामन्यात सहाव्या मिनिटाला ओली वॅटकिंन्सने ऍस्टन व्हिलाचे खाते उघडले. वॅटकिंन्सनेच स्वत:चा व संघाचा दुसरा गोल नोंदविला. दरम्यान अर्सेनल संघातील सेकाने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू मारून ऍस्टन व्हिलाला एक बोनस गोल बहाल केला. या संपूर्ण सामन्यात अर्सेनलला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या विजयामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍस्टन व्हिला सहाव्या स्थानावर आहे. गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी व्हिलाला आणखी तीन गुणांची जरूरी असून त्यांचा एक सामना बाकी आहे. अर्सेनलचा संघ गुणतक्त्यात 11 व्या स्थानावर फेकला गेला आहे.









