वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
सध्या आपल्याला कोणत्याही प्रकारची खरेदी करावयाची असल्यास संबंधीत दुकाने किंवा मोठय़ा मॉल्सचा आधार घ्यावा लागतो. परंतु सध्या कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे ऑनलाईन व्यापारात कार्यरत असणाऱया कंपन्या आपली सेवा घरबसल्या ग्राहकांना उपलब्ध करुन देत असल्याचे मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. यामध्ये सध्या ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांनी 6 ऑगस्टपासून विविध उत्पादनांवर सेलअंतर्गत सवलती देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ऍमेझॉनचा प्राईम डे सेलचाही समावेश आहे.
सदर कालावधीत ग्राहकांना प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. अन्य उत्पादनांत मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब्लेट, स्मार्ट वॉच, स्पीकर, हेडफोन आदींचा समावेश राहणार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे.
ऍमेझॉनची सवलत ही विशेष करुन प्राईम मेंबर्सकरीता राहणार असून जी 48 तास चालणार आहे. तसेच एचडीएफसी ग्राहकांना विविध उत्पादनांवर 10 टक्क्मयांपर्यंत सवलत मिळणार असून यासोबत दोन दिवसांच्या सेल इवेंटमध्ये नो कॉस्ट इएमआय आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
ऍमेझॉनप्रमाणेच फ्लिपकार्ट बिग सेव्हींग डेज नावाने सेल सुरु करणार आहे. हा सेल 5 दिवस राहणार असून 10 ऑगस्टपर्यंत याचा कालावधी राहणार आहे. यामध्ये स्मार्टफोन्स खरेदीवर मोठी सवलत असणार आहे. सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या कार्डधारकांनाही वस्तु खरेदीवर सवलतीचा लाभ उठवता येणार आहे.









