वृत्तसंस्था/ बेंगळूर
ऑनलाईन व्यापार करण्याच्या क्षेत्रातील अग्रेसर असणारी कंपनी ऍमेझॉन इंडिया लवकरच कंपनीशी निगडीत असणाऱया लहान आणि मध्यम(एसएमबी) पातळीवरील लॉजिस्टीक व्यवसायांना मदतीचा कोष उभारण्याच्या तयारीत असल्याचे बुधवारी कंपनीने म्हटले आहे.
एसएमबी जवळपास पूर्णपणे ऍमेझॉनकडून होणाऱया विक्रीवर अवलंबून असते. कंपनीने माहिती देताना म्हटले आहे, की या प्रकारे लॉकडाऊनच्या कारणामुळे एसएमबी आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. परंतु यातून सावरण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी दिला आहे. हा कोष कंपनीसोबत काम करणाऱया जवळपास 40 हजार कर्मचाऱयांना आर्थिकदृष्टय़ा मदत करणार आहे. या सहाय्यामुळे अडचणीत असणाऱया कर्मचाऱयांना काम करण्यास मोठी मदत होणार असल्याचे स्पष्टीकरण ऍमेझॉनने दिले आहे.









