आयफोन 13 सह विविध उत्पादने सादर होणार
नवी दिल्ली
ऍपलने सप्टेंबरमध्ये होणाऱया कार्यक्रमाची नुकतीच घोषणा केली आहे. सदरचा कार्यक्रम हा येत्या 14 सप्टेंबर रोजी होणार असून कंपनीने ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’असे नाव दिले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन व्हर्च्युअल स्वरुपात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ऍपल पार्क येथे हा कार्यक्रम होणार असून आयफोन 13 लाँच करण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता कार्यक्रम सुरु होणार आहे.
नवे आयफोन येणार
सदरच्या कार्यक्रमात कंपनी आयफोन 13 सीरीज लाँच करण्याची शक्यता आहे. या आवृत्तीमध्ये 4 मॉडेल असून आयफोन13, आयफोन13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचा समावेश राहणार आहे.
सॅटेलाइट सपोर्ट
सदर फोनमध्ये सॅटेलाईट कम्युनिकेशन सपोर्ट मिळणार असल्याची माहिती आहे. वर्ष 2019 मध्ये ब्लूमबर्गने या संदर्भात खुलासा केला आहे. फोनमध्ये लवकरच एलईओ सॅटेलाईट कम्युनिकेशन मोडचा वापर करण्यात येणार आहे.









