फोल्डेबल उत्पादनाच्या कार्यात कंपनी व्यस्त
कॅलिफोर्निया : दूरसंचार कंपन्यांमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात उतरण्याची स्पर्धा वेग धरत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये सध्या जगातील दिग्गज टेक कंपनी ऍपलही आपला पहिला फोल्डेबल आयफोन विकसित करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कंपनी येत्या 2022 च्या सप्टेंबरमध्ये पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनचे सादरीकरण करण्याचे संकेत आहेत.
फोल्डेबल आयफोन बाजारात आणण्यासाठी ऍपल तैवानची मटेरियल सप्लायर हॉन हाय आणि निपॉनसोबत मागील काही दिवसांपासून संपर्कात आहे. उपलब्ध माहितीनुसार ऍपल आपल्या पहिल्या फोल्डेबल आयफोनमध्ये ओल्ड या मायक्रो-एलईडी स्क्रीनचा वापर करण्याची शक्यता आहे. ज्याची निर्मिती सॅमसंगकडून करण्यात येणार आहे. कंपनीकडून सध्या स्क्रीन आणि बेयरिंग चाचणी करण्यात व्यस्त आहे. ऍपल कंपनी प्रत्यक्षात 2022 रोजी आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची दाट शक्यता आहे.
ठळक नोंदी…
ऍपलच्या 12 मिनी आणि प्रो मॅक्सचे बुकिंग सुरु
ग्राहकांसाठी 34,000 रुपयांपर्यंत सवलत
निपॉनही फोनसाठी बेयरिंगची करणार खरेदी
फोल्डेबलची चाचणी कठोरपणे होण्याचा अंदाज
गॅलेक्सी फोल्डला शाओमीची टक्कर
ऍपलकडून फाईल केले पेटंट









