प्रतिनिधी /खानापूर
खानापूरच्या रहिवासी ऍड. यशोदा भास्कर पाटील यांची ग्राहक न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपिठाच्या महिला न्यायाधीश म्हणून गदग येथील न्यायालयात नियुक्ती झाली आहे. त्यांचे शालेय शिक्षण खानापूरच्या सर्वोदय विद्यालयामध्ये झाले आहे. तर एलएलबी पदवी त्यांनी आरएल लॉ कॉलेज बेळगाव येथून संपादित केली आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून बेळगाव आणि खानापूर येथील न्यायालयात वकिली करीत होत्या. या त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे पती भास्कर पाटील व त्यांचे चिरंजीव अलोक पाटील हे देखील वकिली व्यवसाय करीत आहेत. खानापूर तालुक्याचे माजी आमदार कै. एल. बी. बिरजे गुरुजी यांच्या त्या भाची सून तर माजी नगरसेविका श्रीमती शांताबाई पाटील यांच्या स्नुषा होत.









