एजंटांची जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : ऍग्री गोल्डमध्ये सर्वसामान्य जनतेचे पैसे गुंतविले गेले आहेत. एजंट म्हणून आम्ही काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आमच्याकडे पैसे मागण्यासाठी येत आहे. आम्हाला तगादा लावत आहेत. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केली आहे. तर काहीजण घरदार सोडून गेले आहेत. सदर कंपनीने पैसे न दिल्याने आम्ही अडचणीत आलो आहोत. तेव्हा तातडीने ऍग्री गोल्डमध्ये गुंतविलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी एजंटांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऍग्री गोल्डमध्ये जवळपास 7 राज्यातील जनतेने पैसे गुंतविले आहेत. कर्नाटकमधील 2 हजार कोटीहून अधिक रक्कम आहे. 6 वर्षे आम्हाला रक्कम परत दिली गेली नाही. या कंपनीची मोठी मालमत्ता आहे. ती विक्री करून आम्हाला तातडीने रक्कम परत द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राजश्री चिन्नमिल्ल, आर. व्ही. संकपाळ, एम. के. शिवराजय्या, नागाप्पा हंपीहोळी, जी. एस. चक्कमठ, एस. व्ही. नायकर, कृष्णा पवार यांच्यासह एजंट उपस्थित होते.









