मुंबई
खासगी क्षेत्रात कार्यरत असणारी ऍक्सिस बँकेला चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत नफा 4.5 टक्क्यांनी वाढून 1,757 कोटी रुपयावर पोहोचला आहे. या आगोदरच्या आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये समान तिमाहीत बँक 1,680.85 कोटीचा निव्वळ फायदा झाला होता. अशी माहिती ऍक्सिस बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या फाईलमध्ये सांगितली आहे. बँकेचे उत्पन्न डिसेंबर तिमाहीत 19,494.87 कोटीच्या घरात राहिला आहे. या अगोदर हा आकडा 18,130.42 कोटी रुपये राहिला असल्याचेही बँकेनी स्पष्ट केले आहे.








