मुंबई :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी ऍक्सिस इकॉर्प यांनी येत्या काळामध्ये 100 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात होणाऱया गुंतवणुकीमार्फत कंपनी येत्या काळामध्ये 25 एकरचा लक्झरी गृहबांधणी प्रकल्प विकसित करणार असल्याची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे.
सदरच्या योजनेअंतर्गत कंपनी 150 सर्व्हिस स्टुडिओ अपार्टमेंट, 70 लक्झरी सर्व्हिस विला आणि 100 प्लॉट डेव्हलपमेंटचा प्रकल्प राबवणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा सीमेवर हा प्रकल्प होणार असल्याची माहिती ऍक्सिस इकॉर्पचे सीईओ आदित्य कुशवाहा यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ झाल्याच्या कारणास्तव आता या भागांमध्ये अनेक विकासक प्रकल्प राबवण्यासाठी येणाऱया काळामध्ये पुढे येतील, अशी शक्मयताही वर्तवली जात आहे.









