प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आज सकाळी 11 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये यासाठी शपथ दिली यामध्ये उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे व त्याचा उस्मानाबाद जिल्हावासियांना सार्थ अभिमान आहे. होतो अभिमान तसाच कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने घरीच बसून राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची शपथ त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत माननीय मुंडे सर हे ही उपस्थित होते.
आज दिनांक 10 मे 2020 रोजी सकाळी 11 वाजता आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद वरून मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद दीपा मुधोळ मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलेली शपथ जिल्हाधिकारी कार्यालयातही अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली. याप्रसंगी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार उस्मानाबाद, तहसीलदार महसूल ,जिल्हाधिकारी कार्यालय नायब तहसीलदार, कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. एक युद्ध कोरोना विरुद्ध मा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रावरून प्रसारित केलेल्या शपथ ग्रहण प्रसंगी घरीच राहून सहभागी झालेले राजेंद्र धावारे, राजश्री धावारे, कु प्रियंका धावारे व प्रतिक धावारे तांबरीविभाग उस्मानाबाद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









