बेंगळूर/प्रतिनिधी
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मंगळवारी तीन दिवसीय बेंगळूर दौऱ्यासाठी दाखल झाले. यावेळी बेंगळूर विमानतळावर उपराष्ट्रपती नायडू यांचे आगमन होताच भाजपच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
उपराष्ट्रपती नायडू यांनी बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील होसाकोट येथे जाऊन विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन व शिक्षण केंद्राला भेट दिली. मोठ्या बहुराष्ट्रीय खगोलशास्त्र प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या दोन युनिट्सचे उद्घाटन त्यांनी केले.
होसाकोट येथील आयआयए चे संशोधन आणि शिक्षण विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (सीआरईएसटी) मध्ये भारतीय खगोलीय वेधशाळा, (आयओए), हॅनले, लडाख येथे टू मीटर हिमालयन चंद्र टेलीस्कोप (एचसीटी) चे नियंत्रण कक्ष आहे. उपराष्ट्रपती बेंगळूरहून ३१ डिसेंबरला चेन्नईला रवाना होतील.