ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंशी आज फोनवर संवाद साधला.
यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे आदित्य ठाकरेंना सांगितले.
मात्र, पुढे ते म्हणाले, मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर, स्क्रीनिंग आणि टेस्टिंग ची संख्या वाढवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, राहुल गांधी यांनी याआधी उध्दव ठाकरेंशी चर्चा करताना काँग्रेस कोरोना संकटात मगविकास आघाडीच्या सोबतच असल्याची ग्वाही दिली होती. तर सरकारमध्ये कायम काँग्रेसचा सन्मान केला जाईल आणि त्यांना सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सामील केले जाईल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना दिले होते.









