उदगाव / वार्ताहर
उदगाव ता. शिरोळ येथील शासकीय कुंजवन कोविड सेंटर मध्ये कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांचा मृत्यू देह रॅपिंग करणे तसेच स्मशानभूमीचेकडे नेण्यासाठी कर्मचाऱ्याकडून सहा हजार रुपये मागितले जातात. सदर चे हे रॅकेट कार्यरत असून यावर तात्काळ कारवाई न झाल्यास दि.19 मे पासून या कोविड सेंटरवर उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती स्वाती सासने यांनी प्रशासनास दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आरोग्य व बांधकाम सभापती यांच्याकडे निवेदन दिले आहे.
रविवारी रात्री चिंचवाड ता.शिरोळ येथील एक रुग्ण या कोविड् सेंटरमध्ये मृत झाला या नंतर मृत्यू देह रॅपिंग करण्यासाठी तसेच पीपीकि साठी कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांकडून सहा हजार रुपयाची मागणी केली होती. संबंधित नातेवाईकांनी याबाबत स्वाती सासणे यांना माहिती दिल्यानंतर स्वाती सासणे यांनी तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, यांच्याशी संपर्क साधून जाब विचारला व त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.सदरची घटना ही भयंकर असून माणुसकीला काळिमा फासणारे असल्याचे यावेळी सासने यांनी सांगितले.
सदरचा प्रकार हा गंभीर असून यामध्ये कर्मचारी वॉर्डबॉय तसेच डॉक्टर यांचा समावेश असण्याची शक्यता असून याची गंभीर दखल घेत या रॅकेटची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा आपण स्वतः 19 तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा स्वाती सासणे यांनी प्रशासनाला दिला आहे.









