वार्ताहर / उदगाव
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोपवाटिकेचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदगावात विविध तंत्रज्ञानाचा वापर करत रोपाची निर्मिती केली जाते. हाच उदगांवचा पॅटर्न राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नाशिक यासह अन्य भागात वापरण्यासाठी रोपवाटीका उत्पादक शेतकर्यांना प्रत्यक्षिके देणार येणार असून रोपवाटीके साठी अनुदान योजना सरकारच्या विचारधीन असल्याचे उदगार महाराष्ट्र राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ दवले यांनी केले.
उदगांव ( ता.शिरोळ ) परिसरात महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या पथकांने विविध विकसित रोपवाटीकांची पाहणी केली. यावेळी एकनाथ दवले बोलत होते. ते पुढे म्हणाले, ऊसापासून अन्य भाजीपाल्याची पिके रोपे लावून घेतली जाते. दर्जेदार पिके यावीत यासाठी विविध विकसित रोपवाटीका गरजेच्या आहेत. यावेळी या पथकाने येथील रवीद्र पाटील यांच्या रोपवाटीकेची माहिती घेवून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील, कोल्हापूर कृषी विभागीय सहसंचालक शिवाजीराव शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, प्रकल्प संचालक सुनंदा कुराडे, उपसंचालक भाग्यश्री फरांडे, उपविभागीय अधिकारी मकरंद कुलकुर्णी, शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, नीता पडळकर, मंडळ कृषी अधिकारी संजय सुतार, उदगांवच्या कृषी सहाय्यक स्वाती माळी मान्यावर शेतकरी उपस्थित होते.









