ऑनलाईन टीम / गोवा
भाजपचे दिवंगत नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून उमेदवारी देणे अपेक्षित असताना भाजपने त्यांना ऐनवेळी डावलल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडाचा पवित्रा घेत आपण पणजी मतदार संघातूनच निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पर्रिकर यांना भाजपने उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने त्यांनी ही भुमिका घेतली असुन त्यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचे ही स्पष्ट केले आहे. त्यामुळे या त्यांच्या निर्णयाचा परिणाम नेमका कोणावर होतो हे पाहणे उत्सूकतेचं ठरणार आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांच्या मुद्यावरुन भाजपवर साधला निशाणा
गोवा विधानसभा रणधुमाळी आता सुरु झाली असुन राजकिय नेत्यांच्या ही फैरी झडत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज गोवा विधानसभेच्या अनुशंगाने तीसरी यादी जाहीर करण्यात आली. यात ९ उमेदवारांची आता पर्यंत नावे जाहीर केली आहेत. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपचे दिवंगत नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मुद्यावरुन उत्पल पर्रिकरांच्याच बाबतीत घराणेशाही कशी आडवी आली ? असा खोचक सवाल उपस्थित करत भाजपवर ताश्चर्य ओढले आहे.