नवी दिल्ली / प्रतिनिधी
उत्तराखंडमधील काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख हरीश रावत यांना पक्षाच्या कारभारात मोकळीक न दिल्याने दिल्लीच्या नेत्यांवर निशाणा साधला. यानंतर लगेच उत्तराखंड काँग्रेस मधील पेच सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्याकडून केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नेत्यांना गुरुवारी दिल्लीत बोलवण्यात आले असून एक-दोन दिवसांत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीत रावतही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष गणेश गोंदियाल हे प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या कारभाराची माहिती देणार आहेत. अधिक माहितीनुसार, हरीश रावत तिकीट वाटपावरून नाराज आहेत कारण त्यांना पक्षाच्या कारभारात जास्त सक्रिय होऊ दिले जात नाही. तसेच निवडणुकीमध्ये सामाजिक नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसने रावत यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले नाही, हे त्यांच्या समर्थकांची प्रमुख नाराजीचे कारण आहे. बुधवारी हिंदीत ट्विट करून हरिश रावत म्हणाले की “आराम करण्याची वेळ आली आहे, बस्स झाले आता.”