ऑनलाईन टीम / लखनौ :
चीनसह विविध देशांत दहशत पसरविणाऱया कोरोनाचा संशयित रुग्ण उत्तर प्रदेशातही आढळल्याने खळबळ उडाली आहे.
चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस इतर देशांमध्येसुद्धा वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित तीन घटना समोर आल्यानंतर राजकीय आपत्ती घोषित करण्यात आली आहे. तसेच यूपी मध्ये 28 वर्षांच्या युवकात कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याला बलरामपूर येथिल सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सद्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, कॅबिनेट सचिवांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, नागरी उड्डान मंत्रालय, वैद्यकीय विभाग, गृह मंत्रालय वाणिज्य तसेच सुरक्षा मंत्रालयाचा अधिकारी आणि सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यात कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी राज्यांच्या एकून तयारीचा आढावा घेण्यात आला.









