ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्के आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिली.
ते म्हणाले, उत्तर प्रदेशात मागील चोवीस तासात 499 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण रुग्ण संख्या 13 हजार 615 वर पोहोचली आहे. त्यामधील सध्या 4,948 रुग्ण ॲक्टिव्ह असून, आता पर्यंत 8 हजार 268 लोकांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.72 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 399 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.









