प्रतिनिधी / पेडणे
उत्कृष्ट विद्यालयाचे संस्थापक उत्तम कोटकर यांचे सोमवारी दि. 14 रोजी सकाळी वयाच्या 85 व्या वषी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यांची एक्झिट सर्वांसाठी धक्कादायक ठरली आहे.
सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित कन्या, दोन पुत्र, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मगो पक्षाचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे ते चुलत बंधू होत.
पेडणेतील शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक चळवळीचे आणि मराठी राजभाषा आंदोलकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या भगवती विद्यालय हे पेडणे बाजारपेठेतील एक सर्वांचे हक्काचे स्थान. आपल्या शाळेचे आवार आणि सभागृह हे बंदिस्थ शिक्षण देणारी एककल्ली संस्था न राहता विविध सामाजिक चळवळीच्या ऊर्जेचे ते केंद्र व्हावे. अशी तळमळ असलेले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम कोटकर यांनी हा आदर्श पायंडा घालून दिला होता. त्यामुळेच भगवती विद्यालय हे पेडण्यातील सर्वव्यापी विचारांचे मुक्त व्यासपीठ बनले. पुस्तक प्रकाशन असो वा महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्यक्रम, मराठी राजभाषा समितीची बैठक, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा उपक्रम अशा अनेक कार्यक्रमांना उत्तम कोटकर यांनी सदैव आपल्या शाळेचे सभागृह उपलब्ध करून उत्तम कोटकर देत असत. येथे होणाऱया विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दिले.
घरची गरिबी असल्यामुळे उत्तम कोटकर यांना गोवा मुक्तिपूर्वी मुंबईत जावे लागले. तिथे उपजीविकेसाठी पडेल ते काम त्यांनी केले. या जगण्याच्या धडपडीत इच्छा असूनही त्यांना शिक्षणापासून वंचित राहवे लागले. प्रतिकूल परिस्थितीमुळे शाळेत न जाऊ शकलेले उत्तम कोटकर यांच्या मनात ही कमतरता कायमच सलत राहिली. गरिबी हा कुणाच्या शिक्षणातील अडसर ठरू नये, असे त्यांना सतत वाटायचे. गोव्यात परतल्यावर त्यांनी कसलाही अनुभव नसताना भगवती शिक्षण प्रसारक या शैक्षणिक संस्थेचा कार्यभार संभाळताना अतिशय कुशलतेने चालवून दाखवली. एखाद्या पीएचडीधारक विद्वानापेक्षाही त्यांचे विचार उदात्त असल्याचे जाणवते. या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत आपण किमान पाच हजार विद्यार्थ्यांची आयुष्य घडवू शकलो, याचा त्यांना सार्थ अभिमान होता. आपले विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी कायम जोपासावा, हा त्यांचा नेहमीच आग्रह राहिला.
‘शंभूराजे’ महानाटय़निर्मितीत मोठे योगदान
पेडणे तालुक्मयात आणि गोव्यात प्रथमच मोकळय़ा रंगमंचावर 520 कलाकारांना घेऊन पेडणे भगवती हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी जे शंभूराजे महानाटय़ सादर करून एक नवा इतिहास घडवला. त्या सर्व कलाकारांचे आणि सर्व रंगमंचावरील व बाहेरील कलाकारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच या महानाटय़ाचे विविध ठिकाणी प्रयोग होण्यासाठी कोटकर यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यासाठी कला संकृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचे त्यांना सहकार्य मिळाले होते .
‘शंभूराजे’ महानाटय़ाने नाटकाद्वारे नवा इतिहास रचला गेला. कोटकर यांच्या पाठींब्यामुळे प्रत्येक कलाकारांने आपले 100 टक्के योगदान देऊन हा प्रयोग यशस्वी केला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
उत्तम कोटकर यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर विविध क्षेत्रातील नागरिकांनी आणि त्याच्या चाहत्यांनी सोशल माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर , आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, माजी मंत्री संगीता परब, काँग्रेसचे युवानेते सचिन परब, मगो नेते जीत आरोलकर, मगो नेते प्रवीण आर्लेकर, नगराध्यक्ष उषा नागवेकर, पत्रकार महादेव गवंडी, निवृत्ती शिरोडकर, मुख्याध्यापक केशव पणशीकर, विक्रमादित्य पणशीकर, आनंद नाईक, तुकाराम, शेटय़े, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, देविदास कुडव, शिवराम देशप्रभू, पेडणे अग्निशामन दलाचे अधिकारी प्रशांत धारगळकर, प्रशांत मांदेकर, सीताराम परब, सदानंद वायगणकर, भारत बागकर, जगन्नाथ सावंत , देवेंद्र प्रभुदेसाई, दयानंद मांदेकर, व्यंकटेश नाईक, दादू परब, उपनगराध्यक्ष मनोज हरमलकर, प्रसाद गवंडी, अजय कलंगुटकर, पत्रकार किशोर नाईक गावकर, प्रसाद ताटकर, रुदेश नागवेकर, श्याम आसोलकर, सूर्यकांत साळगावकर, श्याम आसोलकर, व्यंकटेश घोडगे,पेडणे पत्रकार समिती सदस्यांसह अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.









