प्रतिनिधी / वाकरे
वाकरे ( ता. करवीर ) येथे अतिउच्च वीज दाबामुळे २८ टीव्ही संच आणि २ फ्रिज जळाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेले दोन तीन दिवस भोगावती नदीला आलेल्या महापुरामुळे महावितरणच्या बालिंगे वीज उपकेंद्रातून वाकरे आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित होत होता. महापुराबरोबरच मुसळधार पावसामुळे ठीकठिकाणी विद्युत खांब आणि वीजलाईनवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. गुरुवारी रात्री उशिरा वाकरे येथे वीज पुरवठा सुरू झाला. दरम्यान बसस्टॉप परिसरातील नागरिकांनी आपले टीव्ही आणि फ्रीज सुरू केल्यानंतर त्यामधून धूर येऊ लागला. सुमारे २८ ग्राहकांचे टिव्ही संच आणि ग्राहकांचे फ्रीज जळाले. त्यामुळे ग्राहकांचे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. या सर्व ग्राहकांना वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
सरपंच तोडकर यांची तत्परता
दरम्यान वाकरे फाटा रस्त्यावर पहाटे फिरायला जाणारे नागरिक सुधाकर पाटील यांनी रस्त्यावर झाड पडल्याचे सरपंच वसंत तोडकर यांना कळवले,त्यांनी अवघ्या अर्ध्यातासात ग्रामपंचायत यंत्रणा गतिमान करून झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








