क्रीडा प्रतिनिधी / उचगाव
उचगाव येथे कब्बडी, खोखो व क्रिकेट आदी खेळांना जास्त वाव दिला जात होता. पण बदलत्या काळानुसार फुटबॉल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील होतकरू फुटबॉलपटू या स्पर्धेनंतर तयार होण्यास मदत होईल. गावात नवीन फुटबॉल मैदान तयार झाले आहे. त्याचा फायदा गावातील होतकरू फुटबॉलपटुंना मिळणार आहे, असे प्रतिपादन उचगाव ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण चौगुले यांनी केले.
उचगाव येथे उचगाव फुटबॉल क्लब आयोजित नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार उपाध्यक्षा मथुरा तरसे, बाळकृष्ण तेलसे, गजानन नाईक, बंटी पावशे, उमेश बुवा, मनोहर कदम, भैरू सुळगेकर, अमरिन बंकापुरे, अंजना जाधव, रूपा गोंधळी, पवन देसाई, तौशिब ताशिलदार, उमाशंकर देसाई, अब्बास ताशिलदार आदी उपस्थित होते. या स्पर्धेत बेळगाव तालुक्मयासह धारवाड, हुबळी, गोवा येथील एकूण 20 संघांनी भाग घेतला आहे. प्रारंभी एन. ओ. चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शहीद राहुल सुळगेकर यांच्या फोटोचे पूजन जावेद जमादार यांनी केले. दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचा फुटबॉल क्लबच्या सभासदांनी गौरव केला. पहिला सामना एसआरएस हिंदुस्थान बेळगाव, इलाईट एफ सी धारवाड यांच्यात झाला. सोमवारी अंतिम फेरी होणार आहे.









