उचगांव / वार्ताहर
उचगाव, वळीवडे व गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील विनापरवाना बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.५) उचगाव हद्दीतील कुठ्या मंदिरनजीक कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराची प्रातिनिधिक होळी करण्यात आली. दलित महासंघाच्या वतीने गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून प्राधिकरणाचे नगररचनाकार दिलीप कदम व कनिष्ठ आरेखक लक्ष्मण कदम यांना आंदोलकांनी धारेवर धरले.
उचगावसह गडमुडशिंगी व वळीवडे परिसरात विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामावर अध्याप कारवाई का झाली नाही, केवळ नोटिसा देणे म्हणजे ठोस कारवाई नव्हे, आपल्या डोळेझाकपणामुळे अनधिकृत बांधकामाचे या परिसरात जंगल उभा राहिले आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी केली. त्यावर प्राधिकरणाचे नगररचनाकार दिलीप कदम यांनी आश्वासन दिले की येत्या पंधरा दिवसात बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली जाईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









