वार्ताहर/ उचगाव
उचगाव येथील बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिमाखात उभ्या असलेल्या 21 फुटी अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या चौथऱयावर ‘राजमुद्रा’ बसविण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या राजमुद्रेमुळे चौथऱयाची शोभा अधिकच खुलून दिसत आहे.
उचगावच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिमाखात उभी आहे. खंडू अशोक देसाई व विनायक विष्णू जाधव यांनी ही राजमुद्रा सार्वजनिक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखेला भेटीदाखल दिली आहे. सदर राजमुद्रा बसविण्यात आली आहे.
राजमुद्रेचे कोरीव काम दगडामध्ये केले आहे. उचगाव येथील प्रसिद्ध कोरीव काम करणारे गुंडू लोहार यांनी दगडामध्येही राजमुद्रा कोरून सुबक अशी तयार केली आहे. गुंडू लोहार हे बेळगाव जिल्हय़ातील प्रसिद्ध कारागीर असून त्यांनी लाकडी तसेच दगडामध्ये अनेक मूर्तींचे कोरीव काम केले आहे. त्यांचे यावेळी मंडळातर्फे आभार मानण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभागप्रमुख मिथिल जाधव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा उचगाव प्रमुख नेहाल जाधव, जितेंद्र नाईक, अमोल जाधव, परितोष हुक्केरीकर, ओमकार पाटील, यशराज मण्णूरकर, आदिनाथ सुतार, यशवंत तरळे, उमेश मेणसे, प्रतिक पाटील, रोहित पावले, चेतन लोहार, भीमराव मण्णूरकर, शुभम कणबरकर, परशराम जाधव, अक्षय अष्टेकर, शुभम भोसले, निंगाप्पा लाळगे, लखन पावशे, उदय कदम उपस्थित होते.









