वार्ताहर / उचगाव
उचगाव मणेर मळा भागातील मोळे कॉलनी येथे रात्री उशिरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ते दोघे पती पत्नी इंचलकरंजी येथे आयजी एम रुग्णालयात कोविड कक्षेत उपचार चालू आहेत. तसेच ते राहत असलेला उचगाव पैकी मणेरमळा परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे संपूर्ण मणेर मळा परिसरातील व्यवसाय आज दिवसभर बंद होता संपूर्ण परिसर भितेच्या छायेखाली आहे.
उचगाव मोळे कॉलनी येथील एका किराणा माल दुकानदाराचा मुलगा इंचलकरंजी येथे गेला होता तेथे नातेवाईकांच्या रक्षा विसर्जन साठी गेला होता त्यामुळे त्याचाही स्वँब घेण्यात आला. गुरुवारी सांयकाळी उशिरा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यास लागण झाल्याचे समजले तसेच त्याच्या पत्नीस देखील लागण झाली आहे. त्यांना इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार साठी ठेवण्यात आले आहे.
तर त्यांचे उचगाव मधील सर्व कुटुंबियांना तसेच त्यांचे भाडेकरूना तपासणीसाठी रात्री सीपीआर मध्ये नेण्यात आले आहे तर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम दिवसभर चालू होते संपूर्ण परिसरात औषध फवारणी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली आहे.
रात्री उशिरा हा परिसर सील करण्यात आलेला आहे. यावेळी सरपंच सौ.मालुताई गणेश काळे, तलाठी महेश सूर्यवंशी,ग्रामविकास अधिकारी अजितकुमार राणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम माजी उपसरपंच सचिन देशमुख, उपसरपंच मनीषा गाताडे ,सचिन गाताडे, पोलीस पाटील स्वप्नील साठे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleसाताऱ्यात २२ नागरिकांना डिस्चार्ज तर ३५८ नमुने पाठवले तपासणीला
Next Article फडणवीस सरकारने पाच वर्षे केवळ अभ्यास केला








