दोडामार्ग / वार्ताहर:
कळणे मायनिंग मधील पाण्याचा बंधारा फुटून झालेल्या जलप्रलयात कळणे – उगाडे रस्त्याची जी नुकसानी झाली त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून रस्ता व मोरी दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहेत. तो मंजूर होताच रस्त्याचे काम त्वरित हाती घेण्यात येईल असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने उगाडे येथील सूर्या गवस व ग्रामस्थांचे उद्या स्वातंत्र्यदिनी होणारे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात कळणे मायनिंग मधील बंधारा फुटून माती मिश्रित पाणी आसपासच्या परिसरात घुसले होते. या मातीमिश्रित पाण्यामुळे कळणे – उगाडे या रस्त्यालाही मोठा धक्का बसला. शिवाय रस्त्यावरील मोरीचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. उगाडे, कळणे, तळकट या भागाला जोडणाऱ्या या रस्त्याच्या हानीमुळे तेथून ये-जा करणाऱ्या अनेकांना रस्ताच नव्हता. विशेषत: गोव्यात व दोडामार्ग शहरात नोकरी – धंद्या निमित्त दररोज ये-जा करणाऱ्या समोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. 15 ऑगस्टपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास उपोषण छेडण्याचा इशारा उगाडे येथील सूर्या गवस व ग्रामस्थांनी दिला होता. त्या अनुषंगाने सध्यस्थितीत रस्ता व मोरी दुरुस्तीचे तात्पुरत्या स्वरूपातील काम हाती घेण्यात आले असून परिपूर्ण दुरुस्तीसाठी 52 लाख रुपये एवढा आवश्यक निधीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आला आहे. तो प्राप्त होताच परिपूर्ण रस्ता करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने हे उपोषण सध्या स्थगित करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









