ऑनलाईन टीम / सातारा :
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी मागील 4 वर्षांपासून तुरुंगात आहेत. ईडीने त्यांच्या संपत्ती जप्त केल्या असून, त्यापैकीच एका बंगल्यात 6 लाखांची चोरी झाली आहे.
पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराजवळ डीएसके यांचा सप्तशृंगी बंगला आहे. डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर मालमत्तेसोबत हा बंगलाही ईडीने जप्त केला आहे. या बंद बंगल्यात 16 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. चोरटय़ांनी बंगल्यातले 8 एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर्स, सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातल्या चांदीच्या वस्तू, कॅमेरा, गिझर असा एकूण 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी यांनी चतुश्रृंगी पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरटय़ांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.