प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर नगरपरिषदेला अखेर मुख्याधिकारी मिळाले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारे वैभव साबळे यांची इस्लामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे अवर सचिव सचिन द.सहस्त्रबुद्धे यांनी या बदलीचे आदेश दिले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यानंतर येथील प्रभारी मुख्याधिकारी पदाचा फेरा संपला.
गेल्या अडीच ते तीन महिन्यापुर्वी येथील मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पदोन्नतीवर पंढरपूर येथे बदली झाली होती. मुख्याधिकारी माळी यांची इस्लामपुरात अवघे काही महिने सेवा झाली. ऐन कोरोना काळात नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद प्रभारीवर चालवल्याने स्वच्छता व आरोग्याचा बोजवारा उडाला होता. तर प्रशासकीय पातळीवरील अनेक कामे व निर्णय खोळंबली होती. त्यातच पालिकेच्या विविध शॉपिंग सेंटर मधील अनामत रक्कम व भाडेवाढीसह लिलाव प्रक्रिया सुरु झाली होती. या प्रक्रियेस गाळेधारकांनी विरोध केला. तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र काही पक्ष संघटना लिलाव होण्यासाठी आग्रही आहेत. अशातच तोंडावर नगरपालिका निवडणूक आहे. अशी अनेक आव्हाने नवे मुख्याधिकारी साबळे यांच्या समोर राहणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








