प्रतिनिधी / इस्लामपूर
जलसंपदा मंत्री, व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील विविध विकास कामांच्यासाठी ३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला असून हा निधी नगरपालिका ठराव न करता रस्ते, गटार व अन्य कामांसाठी खर्च करता येणार आहे. यापूर्वी पाटील यांनी राज्य शासनाच्या वतीने १० कोटी, तर जिल्हा नियोजनमधून १५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक शहाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या निवासस्थानी ही पत्रकार बैठक झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस चिमण डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, गटनेते संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी नगराध्यक्ष पै भगवान पाटील, प्रा.अरुणादेवी पाटील, प्रा शामराव पाटील, जेष्ठ नेते बी.ए. पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, युवा नेते संदीप पाटील, माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण, हिंदुराव माळी उपस्थित होते.
शहाजी पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी शहरात बुधवार बैठका घेवून नागरिकांशी संवाद साधताना त्या त्या भागात काय कामे करायची आहेत? याची माहिती घेतली होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी हा निधी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निधीतून शहरातील १६ रस्ते व गटारीची कामे केली जाणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








