प्रतिनिधी / इस्लामपूर
कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी व काही पक्षांच्या पदाधिकारांच्यात उपचाराची कागदपत्रांची फाईल मागण्यास गेल्यानंतर डॉक्टर व त्यांच्यात बाचाबाची झाली. हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. हा प्रकार पेठ-सांगली रस्त्यावरील डॉ.सचिन सांगरूळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये घडला. एका पाठोपाठ एक असे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचले. त्याठिकाणी कापूसखेडच्या मृत तरुणाची पत्नी व डॉक्टर, कर्मचारी यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.
दरम्यान, तक्रारीत गणेश वसंतराव पाटील (कापूसखेड) यांनी म्हटले आहे की, डॉ.सांगरूळकर यांच्या लक्ष्मी-नारायण हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना माझा माझा भाऊ धोंडीराम पाटील याचा दि.२ मे रोजी मृत्यू झाला. भावाचा ऑक्सिजन कमी झाल्याने त्याबाबत जिल्हाधिकारी व अन्य अधिकार्यांना लेखी निवेदन दिले आहे. शुक्रवारी दि. ७ रोजी मी व माझा मित्र रामभाऊ कचरे डॉ. सांगरूळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दुपारी दीड वाजता उपचाराची फाईल घेण्यास गेलो असता,
डॉ.सांगरुळकर व त्यांच्या पत्नी व स्टाफने फाईल माहित नाही. तुम्हाला जे काय करायचे ते करा’, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यान डॉ सांगरूळकर यांनी ही रात्री उशिरा हॉस्पिटलमधील गोंधळा बाबत तक्रार दिली आहे. डॉ.सांगरुळकर हे या तरुणाच्या मृत्यू पासून पाटील कुटुंबियांकडून होणाऱ्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हणत आहेत. पोलीसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद केल्या आहेत. डॉ सांगरुळकर यांनी सुमारे ५५ जणांविरुध्द तक्रार दिली. कोविड प्रादुर्भाव कलम १८८, १६९, १७० अन्वये व जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये गणेश पाटील, शाकीर तांबोळी, सनी खराडे, चंद्रकांत पाटील, रामदास कचरे मृत धोंडीराम यांच्या पत्नी रुपाली पाटील यांचा समावेश आहे.








