प्रतिनिधी / आटपाडी
साऱ्या जगाला समता, बंधुता, शांती, एकता, मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आटपाडीत मुस्लिम दफनभुमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अल्पसंख्याक मुस्लिम फाउंडेशन, शाही जामा मस्जिद यांच्या वतीने कब्रस्थान परिसरात स्वच्छता व डागडुजी करून अनोख्या पध्दतीने ईद-ए-मिलाद साजरी करण्यात आली.
अल्पसंख्याक मुस्लिम फाउंडेशन, शाही जामा मस्जीद यांच्यावतीने अध्यक्ष ताजुद्दीन इनामदार, नजीर मुल्ला, नौशाद मुल्ला, ताहीर इनामदार, शकील मुल्ला, अजमुद्दीन इनामदार, अमन इनामदार, इन्नुस मुल्ला, सलीम इनामदार, अब्बास मुल्ला यांच्यासह मान्यवरांनी पैगंबर जयंती कृतीशील उपक्रमाने साजरी करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी आटपाडीतील कब्रस्थान परिसराची स्वच्छता, काटेरी झुडपांचे उच्चाटन, जागेची स्वच्छता, डागडुजी करण्यात आली.
कोरोनाच्या संकटामुळे पैगबर जयंती दिनी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इस्लाम धर्माची स्थापना करतानाच जगाला समता व शांततेचा संदेश मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा सन्मान आटपाडीत करण्यात आला. पैगंबरांच्या आगमनाचा आनंदोत्सव कब्रस्थान परिसराच्या स्वच्छतेने साजरा करण्याचा हा उपक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद ठरला. आटपाडीसह तालुक्यातील मुस्लिम समाजाने नेहमीच विधायक उपक्रमांना प्राधान्य देवुन सामाजिक समता राखण्याचे काम केले आहे. आत्ताही पैगंबर जयंतीनिमित्त राबविलेल्या या उपक्रमाचे मान्यवरानी कौतुक करत खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतिक असलेली ईद-ए-मिलाद साजरी झाल्याचे सांगितले.
Previous Articleपुणे शहर भाजपचे रविवारी ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’
Next Article उपळे दुमाला येथे दोन गटात तुंबळ हाणामारी








