उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडून पाहणी
पेडणे / प्रतिनिधी

पेडणे तालुक्मयात दोन दिवस पडलेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाहिलेल्या तुफानी वा-यामुळे मोठय़ा प्रणात नुकसान झाले . बुधवारी तिळारी धेरणाचे पाणी सोडल्याने इब्रामपूर चांदेल -.हसापूर , हाणखणे, तळर्ण शिरगाळ धारगळ भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. शेती तसेचबागाईतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान पूरसदृष्य भागाची उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी तातडीने दखल घेत या भागाचा दौरा अधिकाऱयांना सोबत घेऊन केला. यावेळी पूरात सापडलेल्या नागरिकांना आजगावकर यांनी धैर्य देत संबधित अधिकारी तासेच अग्निशमन दर आणि पोलीसा यंञणेला दक्ष राहून नागरिकांना सर्वतोपरी साहकार्य करावे व ज्याच्या घरात पाणी गेले त्यांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले.
गेल्या वषी तिळारी धरणाचे पाणी सोडल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पेडणे तालुक्मयातील इब्रापूर हणखणे तळर्ण हळर्ण चांदेल हसापूरा धारागळ आदी भागातील नागरिकांचे आणि शेतकऱयांचे नुकसान झाले होते. या वषीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपमुख्यमंञी बाबू आजगावकव यांनी बुधवारी इब्रामपूर , चांदेल हसापूर हळर्ण तळर्ण तृसेच शिरगाळ व जवळच्या परिसरात तिळारीचे पाणी सोडल्यानंतर नदी किनारी भागातील नागरिकांच्या जीवाला धोका असणार यासाठी सरकारी यंञणेला तातडीने घेऊन या भागाचा दौरा केला. यावेळी पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशंकरनिपाणीकर , पेडणे मामलेदार अनंत मळीक, पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस , इब्रामपूर हणखणे सरपंच सोनाली इब्रामपूरकर, चांदेल हसापूर सरपंच संतोष मळीक, झिलू हळर्णकर , दाजी गावस, राजाराम गावस, दाजी शिरोडकर , तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
धारगळ पंचायत क्षेत्रातील शिरगाळ भागात नदीकिनारी असलेल्या भागाची उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी पहाणी केली. यावेळी नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली व संबंधित अधिकारी तसेच आपत्कालीन यंञणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले.









