मुंबई :
झेक प्रजासत्ताकची कंपनी गाइडव्हीजनची खरेदी इन्फोसिस करणार असल्याचे कळते. ही खरेदी 260 कोटी रुपयांना होणार असल्याचे समजते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसने गाइडव्हीजनचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केले आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे. अधिग्रहणाची प्रक्रिया आर्थिक वर्ष 2021 च्या तिसऱया तिमाहीत होण्याचा अंदाज आहे. इन्फोसिसची सहकारी कंपनी इन्फी कन्सल्टींग कंपनी लिमिटेडमार्फत हे अधिग्रहण होणार आहे. प्रशिक्षण अकादमी असणाऱया गाइडव्हीजनचा झेक प्रजासत्ताकसह हंगेरी, पोलंड, जर्मनी आणि फिनलँड या देशात व्यवसाय आहे. यायोगे इन्फोसिस आपला विस्तार करण्याचा प्रयत्न आगामी काळात करणार आहे.









