प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे दि. 2 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ‘अवयवदान’ या घोषवाक्मयावर स्वदान क्रिएटिव्ह सर्च असा उपक्रम राबविला. या अंतर्गत क्लबने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 ऑनलाईन स्पर्धा घेतल्या. यामध्ये 121 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये अवयव दानाबद्दल जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा हेतू होता.
स्पर्धेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना टाईम इन्स्टिटय़ूट येथे झालेल्या कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून तुळसा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंजिरी पाटील, इव्हेंट चेअरमन उर्मी शेरेगार तसेच सदस्या शिल्पा मनोज, श्रुती कित्तूर आदींनी पुढाकार घेतला.









