मुंबई
इनफिनिक्स झिरो 8 आय हा नवा बजेट स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात दाखल झाला आहे. हा नवा स्मार्टफोन रियलमी 6 आय व रेडमी नोट 9 प्रो या स्मार्टफोन्सना चांगलीच टक्कर देणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नव्या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा असणार असून फोनची किंमत 14 हजार 999 रुपये असणार आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमतेसह येणारा हा फोन सिल्वर डायमंड आणि ब्लॅक डायमंड रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.









