स्प्री हॉटेलसह गेस्ट हाऊस क्षेत्रात – व्यवसाय विस्ताराला चालना
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाइन ट्रव्हल प्लॅटफॉर्म क्षेत्रातील इझमाय ट्रिपने हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कंपनी स्प्री हॉस्पिटॅलिटीचे अधिग्रहण केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. इझमाय ट्रिपचे हे दुसरे अधिग्रहण आहे. स्प्री हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून अधिग्रहण केल्यानंतर कंपनीच्या महसूलामध्ये वाढ होऊन आगामी काळात व्यवसाय विस्तारही उत्तम पद्धतीने करता येणे शक्मय होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आमच्या ग्राहकांना येणाऱया काळामध्ये सवलतीच्या आकर्षक योजनांचा लाभ घेता येणार असल्याचेही इझमाय ट्रिपने म्हटले आहे. सदरचे अधिग्रहण करण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेबाबत मात्र खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यवहाराची रक्कम मात्र गुलदस्त्यातच राहिली आहे. परंतु सदरच्या अधिग्रहणानंतर इझमाय ट्रिपला आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.
स्प्री हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय
स्प्री हॉस्पिटॅलिटीचा शुभारंभ केशव बालजी यांनी 2011 साली केला होता. हॉटेल, कॉर्पोरेट गेस्ट हाऊस, रेजिडेन्शीयल क्लब्स स्प्री हॉस्पिटॅलिटी अंतर्गत चालवले जातात. कर्जमुक्त कंपनीचा व्यवसाय बेंगळूर, मुंबई, पुणे, चेन्नई, गोवा, हैदराबाद, कोची, मनाली, देहरादून, कोईमतूर आणि दिल्ली या ठिकाणी विस्तारलेला आहे. कंपनीने 18 नव्या हॉटेल संदर्भात करार केला असल्याचे समजते.









