देशातील पहिली महिला बॉक्सिंग प्रशिक्षक
पुरुषप्रधान भागात 20 युवकांना देतेय प्रशिक्षण
इजिप्तच्या बेनी सुएफ शहरात आठवडय़ात केवळ दोनवेळा एका छोटय़ाच्या खोलीतील जिम सुरू दिसते. येथे 36 वर्षीय सबा सक्र 18 ते 30 वयोगटातील 20 हून अधिक युवकांना बॉक्सिंगचे धडे देते. देशाची राजधानी कैरोमध्ये महिलांना असे काम करण्यास मनाई आहे, पण राजधानीपासून 100 किलोमीटर अंतरावरील या कृषिप्रधान भागात सबा हे प्रशिक्षण केंद्र उत्तमप्रकारे चालवत आहे. इजिप्तच्या परंपरावादी आणि सामजिक बंधनयुक्त समाजात ती युवकांना प्रशिक्षण देत आहे. सबा इजिप्तची पहिली महिला बॉक्सिंग कोच आहे.

पूर्वी हे कुणालाच मान्य नव्हते. इजिप्तमध्ये महिलांनी अशा कुठल्याही क्रीडाप्रकाराचा प्रशिक्षक होणे स्वीकारार्ह नाही. पण माझा ध्यास आणि मेहनत पाहून सर्वजण तयार झाले. एका छोटी खोली भाडेतत्वावर घेत ही जिम सुरू केली हीत. हळूहळू सामग्री जमविली. पुरस्कारादाखल प्राप्त रकमेतील मोठा हिस्सा या जिमकरता वापरला असल्याचे सबा सांगते. बेनी सुएफमध्ये प्रशिक्षकांचा अभाव आणि सबाचा अनुभव तसेच योग्यता पाहून मी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतल्याचे अम्र सलाह इल्दिनने सांगितले आहे.
2 वर्षांत 10 हून अधिक पदके
प्रशिक्षकाने माझी शक्ती आणि ऊर्जा पाहून माझी बॉक्सिंगसाठी निवड केली. मला हा क्रीडाप्रकार पसंत नव्हता, कारण मला माझ्या चेहऱयाची काळजी होती असे सबाने सांगितले आहे. कोचमुळे सबा बॉक्सिंग रिंगणात उतरली, पण रिंगणात उतरल्यावर दोन वर्षांमध्ये तिने अनेक स्पर्धा आणि 10 हून पदके जिंकली आहेत. त्यानंतर तिने प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. घटस्फोटित सबाला एक मुलगा देखील आहे.









