प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी येथील रसना कॉर्नर नजीक सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर व एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात १२ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४ दुचाकी, ७ मोबाईल आणि २२५०० रुपयांची रोकड असा १ लाख ७३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गावभाग पोलिसांनी केली.
अटक केलेल्यामध्ये बाबासो परिसा हुल्ले (रा. रसना कॉर्नर), अमोल शामराव होगाडे (रा. सरस्वती मार्केट), बाळू शंकर आरगे (रा. विक्रम नगर), सदाशिव शिवगोंडा तोडकर (रा. पाटील मळा), अमोल दत्तात्रय दानवाडे (रा. टिळक रोड), बाळासो मोहनराव नाईक (रा. नदिवेस नाका), रमेश गणपती उकले (रा. टिळक रोड), प्रशांत बाबुराव होमकर (रा. गुजरी पेठ), सचिन अशोक खाडे (रा. गुजरी कॉर्नर), अनंत बाळासाहेब कुडचे (रा. कुडचे मळा), संतोष वसंत चव्हाण (रा. नाट्यगृहामागे) यांचा समावेश आहे. तर मटका घेत असताना विनोद शांतीलाल शहा (रा. सम्राट अशोक नगर) याला अटक केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









