इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील आज सायंकाळ पर्यन्त आलेल्या अहवालात 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घोडावत कॉलेज अतिग्रे येथे हे सर्वजण संस्थात्मक विलगिकरण कक्षात आहेत. प्राप्त अहवालामध्ये गुरूकन्नननगर येथील पॉझिटिव्ह आलेल्या यंत्रमाग कामगारांच्या संपर्कात आलेल्या ३७ वर्षीय व ४५ वर्षीय हे यंत्रमाग कामगार लिंबू चौक व गुरूकन्नननगर येथील आहेत.
तर कोरोना बाधित असणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या १६ वर्षीय मुलगी व ५० वर्षीय बहिणीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५७ वर पोहचली असून यापैकी ४मयत व ६ कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ४७ जण उपचार घेत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








