तीन वर्षे शिक्षा व 25 हजार रुपयाचा प्रत्येकी दंड
इचलकरंजी / प्रतिनिधी
जबरी चोरी, दुखापतीच्या खटल्यात मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना न्यायालयाने दोषी धरुन, त्यांना तीन वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी 25 हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली ठोठाविली. शुभम नितीन भोसले, सौरभ मकरध्वज माने, रोहित गजानन जाधव अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपीची नावे आहे.
खटल्याची पार्श्वभुमी अशी, सुरेश गुरव या युवकाला आरोपी शुभम भोसले, सौरभ माने, रोहित जाधव या तिघा जणांनी अडवून मारहाण करुन, त्याच्याकडील एक मोबाईल व 21 हजार 80 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले होते. या घटनेचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसात झाला होता. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुळीक यांनी करून, तिघा विरोधी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी होवून, सुनावणीवेळी सरकारी वकील आर.आर.डावाळे यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानून तिघा आरोपीना शिक्षा ठोठावली.