नवी दिल्ली
सीक्वीया कॅपिटलची सहकारी ट्रव्हल क्षेत्रातील इक्सिगो कंपनी आपला आयपीओ बाजारात आणणार असून या आयपीओच्या माध्यमातून 1600 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. आयपीओअंतर्गत कंपनी 750 कोटी रुपयांचे नवे समभाग सादर करणार असून आयपीओसंदर्भातला अर्ज सेबीकडे सादर करण्यात आला आहे. सध्याचे प्रवर्तक व गुंतवणूकदार याअंतर्गत 850 कोटींचे समभाग विकू शकणार आहेत. ट्रव्हल क्षेत्रात सेवा देणारी ही कंपनी अलोक वाजपेयी यांनी 2017 मध्ये सुरू केली होती.









