नवी दिल्ली
आता आपल्याला विमानातून प्रवास करायचा असेल तर इएमआय (समान मासिक हप्ता) वरही करता येणं शक्य होणार आहे. स्पाइसजेटने सोमवारी आपली नवी योजना सुरू केली असून याअंतर्गत प्रवाशांना तिकीटासाठी 3, 6 महिने किंवा 12 महिन्यांच्या परतफेडीचा कालावधी रक्कम भरण्यासाठी दिला जाणार आहे. कंपनीने दिल्ली ते पॅरीससाठी थेट विमानसेवा सुरू केली आहे. इएमआय योजनेसाठी ग्राहकांना पॅन नंबर, आधार नंबर यासंबंधीची माहिती देणे बंधनकारक असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.









