ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात गेल्या १६ दिवसांत १४ वेळा पेट्रोलची दरवाढी झाली आहे. मुंबईसह (mumbai) गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दराने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. मात्र दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळं सर्वसामन्यांना आजही दरवाढीतून दिलासा मिळाला आहे.
भारतीय तेल कंपन्यांनी इंधन दरांत आज कोणताही बदल केलेले नाहीत. दोन दिवस झालं इंधन( fuel) दर स्थित आहेत. दरम्यान, देशात २२ मार्चला इंधन दर वाढले होतो. १६ दिवसांत आजपर्यंत १४ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत १० रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी ४ नोव्हेंबर, २०२१ नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
दरम्यान, तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. दोन दिवस झालं दर स्थिर आहेत. सध्या देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत १२०.५१ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत १०४.७७ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपयांवर स्थिर आहे.