मुंबई
एनएसईवर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सचे समभाग शुक्रवारी जवळपास 11 टक्के इतके घसरलेले पाहायला मिळाले. शुक्रवारी कंपनीचा समभागाचा भाव 215 रुपयांवर होता. कंपनीचे मुख्य प्रवर्तक समीर गेहलोत यांनी 11 टक्के इतका हिस्सा नुकताच विक्री केला आहे. खुल्या बाजारात ही विक्री करण्यात आल्यानंतर याचा परिणाम समभागावर शेअर बाजारात दिसला. गेल्या 2 दिवसापासून कंपनीचा समभाग 31 टक्क्यांनी घसरला आहे.









