ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकच्या इंट्रानेसल बूस्टर डोसच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. बूस्टर डोसच्या फेज 3 च्या चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. या इंट्रानेसल लसीमध्ये ओमिक्रॉनसह कोरोनाच्या विविध प्रकारांचे संक्रमण रोखण्याची क्षमता आहे.
कोवॅक्सिनसोबत बीबीव्ही 154 ची प्रतिकारशक्ती आणि सुरक्षितता यांची तुलना करण्यासाठी फेज -3 क्लिनिकल चाचणी प्रोटोकॉल मल्टी-सेंटरच्या अभ्यासानुसार करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात भारत बायोटेकने एफडीएकडे नेसल लसीच्या फेज 3 ची चाचणी घेण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता. या इंट्रानेसल लसीचा डोस देशात कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला तोंड देण्यासाठी मदतगार ठरेल. नाकातून देण्यात येणाऱ्या या कोरोना लसीची देशात नऊ ठिकाणी चाचणी केली जाणार आहे.









